अफगाणिस्तानच्या सहा नागरिकांना अटक; मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्ट प्रकरण उघडकीस 
मुंबई

अफगाणिस्तानच्या सहा नागरिकांना अटक; मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्ट प्रकरण उघडकीस

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या भारतीय पासपोर्टचा वापर करून परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान सहा अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या भारतीय पासपोर्टचा वापर करून परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान सहा अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सहारा पोलिसांनी पाच गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी सुमारे दहा वर्षांपूर्वी अफगाण पासपोर्टवर पर्यटन किंवा वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते भारतात राहिले आणि कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून परदेशात प्रवास करत होते.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये नियाझ मोहम्मद रहीम खान (४१), गुल मोहम्मद शिरुल्ला, हमदुल्लाह हाजी लाहूर (३७), शेरबत अली शाह खान, सुजान खान आणि अमजद खान (४०) यांचा समावेश आहे. आरोपींनी पासपोर्ट मिळवताना जन्मस्थळ आणि अन्य वैयक्तिक माहिती खोटी दिल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान बनावट मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, जन्म प्रमाणपत्र तसेच अन्य भारतीय ओळखपत्रे जप्त करण्यात आली. काही आरोपींनी बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे दुबई, अफगाणिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीला प्रवास केल्याचेही तपासात समोर आले आहे.

अमजद खान याला २१ सप्टेंबर रोजी दुबईला जाण्याच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आले. इमिग्रेशन नोंदीनुसार तो १७ सप्टेंबर २०१५ रोजी अफगाण पासपोर्टवर ‘मोहम्मद खालिद’ या नावाने भारतात आला होता.

त्यानंतर त्याने मुंबई प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून कथित खोटी माहिती देऊन २०१८ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवला.

भारतीय पासपोर्टच्या गैरवापराची प्रकरणे वाढली

पोलिसांच्या माहितीनुसार, अफगाण नागरिकांकडून भारतीय पासपोर्टच्या गैरवापराची प्रकरणे अलीकडे किंचित वाढली आहेत. त्याचवेळी भारतीय पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'पुढच्या वर्षी लवकर या'...; गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या बाप्पाला निरोप

ज्ञानेश कुमारांचा पाय आणखी खोलात; सीईसींच्या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान, २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्तांनी २४ तासांत राजीनामा द्यावा - सीजेपी

जनमनातील शंका दूर कराव्या - चिराग पासवान

MPSC पेपरफुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर