प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम

गेल्या काही महिन्यांत मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि संपूर्ण बॅगाच चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

गेल्या काही महिन्यांत मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि संपूर्ण बॅगाच चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

अलीकडेच घडलेल्या एका घटनेत मुंबईहून चेन्नईला प्रवास करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेच्या बॅगेतून सोन्याचे झुमके, अंगठी आणि चांदीची साखळी चोरीला गेली. तिने सहार पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर एका १९ वर्षीय आयरीश विद्यार्थिनीची कपडे आणि वैयक्तिक साहित्य असलेली संपूर्ण बॅगच विमानतळावरून गायब झाली.

तपासातील मोठी आव्हाने

चेक-इन, सिक्युरिटी स्क्रीन, सॉर्टिंग, लोडिंग आणि शेवटी कन्व्हेयर बेल्ट अशा अनेक टप्प्यांतून सामान जाते. त्यामुळे चोरी नेमकी कुठे झाली हे शोधणे कठीण जाते.

प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतरच दागिने किंवा वस्तू गायब असल्याचे लक्षात येते. तक्रार नोंदवण्यास उशीर झाल्यामुळे शेकडो कर्मचारी आणि प्रवाशांचा शोध घेणे जिकिरीचे बनते.

'मुंबई नॉर्थ सेंट्रल डिस्ट्रिक्ट फोरम' (एमएनसीडीएफ) चे सह-संयोजक युरिच कामथ म्हणाले, काही विमान कंपन्यांकडे अशा समस्या निवारणासाठी योग्य यंत्रणा नाही. बॅग योग्य रीतीने पोहोचली आहे की नाही किंवा तिचे नुकसान झाले आहे का, याबाबत त्या स्पष्टता देत नाहीत. कंपन्यांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे पोलीस तपासातही अडथळे येतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...