Mumbai : अंधेरीत बेस्ट बसचा विचित्र अपघात; रिक्षा, चारचाकी वाहनांना धडक, तीन जखमी  
मुंबई

Mumbai : अंधेरीत बेस्ट बसचा विचित्र अपघात; रिक्षा, चारचाकी वाहनांना धडक, तीन जखमी

अंधेरी पश्चिमेकडील गोखले पुलाच्या सिग्नलजवळ बेस्टच्या ओशिवरा आगारातील बसचा सोमवारी विचित्र अपघात झाला.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील गोखले पुलाच्या सिग्नलजवळ बेस्टच्या ओशिवरा आगारातील बसचा सोमवारी विचित्र अपघात झाला. कंत्राटावरच्या या बसने रिक्षा चारचाकी वाहनांना धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.

अंधेरी पश्चिमेकडील गोखले पुलाजवळील सिग्नलजवळ ओशिवरा बस आगाराची ‘ए-२२१/३६’ क्रमांकाची बस (क्रमांक ४१२६) अंधेरी बस स्थानक पश्चिम येथून वर्सोवा बस स्थानकाच्या दिशेने जात होती. सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजता गोखले पुल सिग्नलजवळ बस चालकाने हँडब्रेक काढला.

त्यानंतर बस अचानक पुढे सरकली आणि सिग्नलवर असलेल्या वाहनांना धडकली. या धडकेत चार रिक्षा, एक कार आणि एक स्कूटरचे नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालक युनूस शेख यांच्या नाकाला दुखापत झाली. पादचारी मनोजकुमार बजदेव यांच्या मानेला दुखापत झाली, तर दुचाकी चालक अनिस निसार धारी यांच्या कमरेच्या उजव्या बाजूला दुखापत झाली. बसच्या वाहकाने तत्काळ पोलिसांना १०० क्रमांकावर माहिती दिली आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान , डी.एन. नगर पोलिस ठाण्यात बेस्ट विरोधात तक्रार दाखल केली.अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मी महाराष्ट्रातच! मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार; दिल्लीत मोदींची भेट, विकास प्रकल्पांबाबत चर्चा

भाजपची ‘नवीन’ टीम जाहीर; तावडे सरचिटणीसपदी कायम, भारती पवार उपाध्यक्ष, स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांची ‘पदवापसी’

Mumbai : आयकर भवनच्या तळघरात भीषण आग; Video

Mumbai : बँक्वेट हॉलला आग; कोणीही जखमी नाही, Video

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार - रामदास आठवले