Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 
मुंबई

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाचे (कोलडोंगरीचा विघ्नहर्ता) यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून मंडळ यंदा नामवंत कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हिंदुस्थानातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाचे (कोलडोंगरीचा विघ्नहर्ता) यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून मंडळ यंदा नामवंत कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हिंदुस्थानातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.

६० बाय ६० आकाराच्या मंडपात मंदिर साकारले असून दोन महिन्यांपासून २५ ते ३० कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत. सभामंडप वातानुकूलित असणार आहे. विभागातील युवा मूर्तिकार मितेश डिंगणकर यांनी बाप्पाची सुबक मूर्ती साकारली आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षात यंदा १४ ते ३० सप्टेंबर असे १६ दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान मंडळ प्रत्येक दिवशी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना चिटणीस राजाभाऊ ठाणगे यांनी दिली.

रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा, आधार कार्ड पॅम्प, गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च अशा सामाजिक उपक्रमांसोबत शरीरसौव स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर अशा विविध स्पर्धा मंडळाकडून घेण्यात येतात. मंडळाने यंदा 'माझा लाडका लाडका लाडका कोलडोंगरीचा विघ्नहर्ता' हे गाणे तयार केले आहे. अमोल कदम गीतकार असून शिरीष पवार गायक आहेत. शिरीष पवार यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Sindhudurg : महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तावेजीकरण; 'Bappa.org' मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

Thane : गणरायाच्या स्वागतासाठी ठाणे जिल्हा सज्ज; १ लाख ८२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जनासाठी १९३ ठिकाणी व्यवस्था

रशियाची भारतातून विक्रमी इंधन आयात; युक्रेनच्या हल्ल्यांमुळे देशांतर्गत शुद्धीकरण क्षमता बाधित

Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम