Mumbai : प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन दहनभूमी कार्यान्वित 
मुंबई

Mumbai : प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन दहनभूमी कार्यान्वित

मुंबई महापालिकेने देवनार आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी आणि पक्ष्यांसाठी नवीन स्मशानभूमी सुविधा उभारली आहे.

Swapnil S

अमित श्रीवास्तव/मुंबई

मुंबई महापालिकेने देवनार आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी आणि पक्ष्यांसाठी नवीन स्मशानभूमी सुविधा उभारली आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांना आपल्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एक पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने ही सुविधा सुरू केली असून १ एप्रिल २०२६ पासून ती कार्यान्वित झाली आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सोयीमुळे मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांना हक्काची सुविधा मिळाली आहे. मालाड येथे २०२३ पासून अशा प्रकारची सुविधा आधीच कार्यरत आहे. देवनार येथील केंद्र पीएनजी इंधनावर चालणारे असून तेथे ५०० किलो वजनापर्यंतच्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करता येतील. महालक्ष्मी येथील केंद्र विद्युत असून ते ५० किलोपर्यंतच्या प्राण्यांसाठी डिझाइन केले आहे. ही दोन्ही केंद्रे ‘टाटा ट्रस्ट’ आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या प्राणी रुग्णालयाच्या परिसरात आहेत.

या उपक्रमामुळे मुंबईतील सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारेल आणि पाळीव प्राणी मालकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन नोंदणी आवश्यक

नागरिकांना या सुविधेसाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येईल किंवा ७५६४९७६६४९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध; अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप

काँग्रेसच्या महिलाविरोधी भूमिकेमुळे देशाचे नुकसान! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

आजचे राशिभविष्य,१९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Akshaya Tritiya 2026 : आज अक्षय्य तृतीया; 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी, जाणून घ्या सविस्तर

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा खास मराठी संदेश आणि आकर्षक कार्डस्