मुंबई

५ मे पासून नेहरू सेंटर येथे मुंबई आर्ट फेअर

प्रतिनिधी

मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कला दालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. ही संस्कृती जोपासत मुंबईतील नेहरू सेंटर येथे मुंबई आर्ट फेअरच्या चौथ्या पर्वाला ५ मे ते ७ मे या कालावधीत सुरुवात होत आहे. ‘मूर्त -अमूर्तकला संगम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कला प्रदर्शनात प्रस्थापित कलाकारांपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत ३५० कलाकार एकत्र येणार आहेत. देशभरातील वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी रसिकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, अँबस्ट्रॅक्ट, वास्तवदर्शी चित्रे, शहरचित्रे, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व विषयांवरील चित्रे त्यांच्यात सखोल दडलेल्या अर्थासह येथे पाहता येणार आहेत. वास्तवाऐवजी भावना, संवेदना, कल्पना आणि विषयभावांवर भर देत विविध कलाकार आणि शैली एकत्रित आणणे हे मुंबई आर्ट फेअरच्या चौथ्या पर्वाचे उद्दिष्ट आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस