Mumbai : रिक्षा-टॅक्सीची पुन्हा भाडेवाढ? संग्रहित छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

Mumbai : रिक्षा-टॅक्सीची पुन्हा भाडेवाढ?

रिक्षा आणि टॅक्सीच्या नियोजित भाडेवाढीला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Swapnil S

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या नियोजित भाडेवाढीला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र, या निर्णयाबाबत प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. इंधन आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी गेल्या काही आठवड्यांपासून भाडेवाढीची मागणी लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्याला मंजुरीही देण्यात आल्याचे समजते.

प्रस्तावित भाडेवाढ नेमकी किती रुपये असेल आणि सुधारित दर कधीपासून लागू होणार, याबाबतची निश्चित माहिती अद्याप हाती आलेली नाही. या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यास मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रातील लाखो दैनंदिन प्रवाशांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. परिवहन विभागाचे अधिकारी लवकरच या निर्णयाबाबत औपचारिक परिपत्रक किंवा माहिती प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सध्या लागू असलेले जुनेच भाडेदर कायम राहतील.

Mumbai : भक्तांना दिलासा! POP च्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात; उच्च न्यायालयाचा गतवर्षीचा निर्णय कायम

सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी; अन्न आणि औषध प्रशासनाची घोषणा, उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास

साखरेच्या साठेबाजीला चाप; सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर बंधने, ग्राहकांना दिलासा

जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया...

वंदे मातरम् : राष्ट्रभक्ती की राजकारण?