Mumbai : विद्यार्थ्यांना पालिकेच्या फक्त २० जागा मिळणार; नर्सिंग कॉलेजच्या खासगीकरणाला विरोध 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : विद्यार्थ्यांना पालिकेच्या फक्त २० जागा मिळणार; नर्सिंग कॉलेजच्या खासगीकरणाला विरोध

वांद्रे पश्चिम येथील के.बी. भाभा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज खासगी कंपनीला चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला विरोध सुरू झाला आहे. या महाविद्यालयाचे खासगीकरण करण्याऐवजी ते मुंबई महापालिकेच्याच अखत्यारित ठेवून त्याचे नर्सिंग पदवी महाविद्यालयात रूपांतर करावे, याकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील के.बी. भाभा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज खासगी कंपनीला चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला विरोध सुरू झाला आहे. या महाविद्यालयाचे खासगीकरण करण्याऐवजी ते मुंबई महापालिकेच्याच अखत्यारित ठेवून त्याचे नर्सिंग पदवी महाविद्यालयात रूपांतर करावे, याकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देण्यात आल्याचे पडवळ यांनी सांगितले.

भाभा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज खासगी कंपनीला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत चर्चेला आला होता. या प्रस्तावानुसार खासगी कंपनीला ८० जागा, तर महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ २० जागा उपलब्ध होणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. खासगी नर्सिंग महाविद्यालयात प्रति विद्यार्थी वार्षिक सुमारे १.६० लाख रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे ८० विद्यार्थ्यांकडून कंपनीला वर्षाकाठी सुमारे १ कोटी २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

परिचारिकांची कमतरता

महापालिकेच्या केईएम, कूपर, नायर आणि सायन रुग्णालयांमध्ये नर्सिंगचे शिक्षण दिले जाते. दुसरीकडे पालिका रुग्णालयांमध्ये परिचारिकांची कमतरता जाणवत असताना स्वतःचे नर्सिंग कॉलेज खासगी संस्थेला देणे योग्य नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

पालिकेनेच महाविद्यालय चालवावे

भाभा नर्सिंग कॉलेजचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करून पालिकेमार्फतच हे महाविद्यालय चालवावे. तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमाऐवजी पदवी स्तरावरील नर्सिंग शिक्षण सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना माफक शुल्कात उच्च शिक्षणाची संधी मिळण्याबरोबरच महापालिका रुग्णालयांतील परिचारिकांची कमतरता भरून काढण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्येष्ठांना हेलपाटे मारायला लावू नका! उच्च न्यायालयाने बँकेला खडसावले

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

गरीब मुलांना शिक्षणाच्या पुरेशा संधी मिळत नाहीत; ज्येष्ठ पटकथा लेखक-गीतकार जावेद अख्तर यांची खंत

Mumbai : गोवंडीत इमारतीला आग; एक वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

तेव्हाही लढलो, आताही तेच करणार : रोहित पवार