मुंबई

मुंबईतील सागरीकिनाऱ्यांचे वैभव पुन्हा परतणार; जिओ क्यूब तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना, पालक मंत्री दीपक केसरकर यांचे सुतोवाच

मुंबईतील दादर, माहीम आदी समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने तेथे जिओ क्यूब तंत्राचा वापर करून हे किनारे पूर्ववत केले जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील दादर, माहीम आदी समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याने तेथे जिओ क्यूब तंत्राचा वापर करून हे किनारे पूर्ववत केले जाणार आहेत.

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका मुख्यालयात पत्रकारांना सांगितले, की मुंबईतील दादर, माहीमसारख्या प्रमुख चौपाट्या आता केवळ २० ते २५ फूट इतक्या शिल्लक राहिल्या आहेत. त्या पूर्ववत करण्याचे काम केले जाणार आहे. वर्षभरात हे किनारे पूर्ववत केले जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांची धूप झाली आहे त्या जागेत जिओ क्यूब टाकले जातील. हे जिओ क्यूब पर्यावरणस्नेही आहेत. त्यामुळे येथे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. त्याचबरोबर दादरसारख्या किनाऱ्यांना पुन्हा त्यांचे वैभव प्राप्त होईल. याच धर्तीवर प्रभादेवी ते माहीम हा किनारा पूर्ववत संवर्धित करण्याचा आमचा विचार आहे.

हवा प्रदूषण कमी करण्याचा लखनऊ पॅटर्न

केसरकर यांनी सांगितले की, मुंबईत हवा प्रदूषणाची समस्या वाढते आहे. त्याला आळा घालण्यासाठी आम्ही लखनऊ पॅटर्नचा वापर करणार आहोत. या योजनेत धुली कण हे हवेतच एकत्र करून ते जमिनीवर खाली पाडण्याचे तंत्र वापरले जाते. या तंत्राचे सादरीकरण आम्ही पालिका आयुक्तांपुढे करणार आहोत. त्यानंतर मुंबईच्या काही भागात त्याची चाचणी केली जाईल. ते यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात हवा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश