Mumbai : चार्जिंग गन पॉइंट चोरीला; शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : चार्जिंग गन पॉइंट चोरीला; शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस

गोवंडी शिवाजीनगर डेपोत १० चार्जिंग गन पॉइंटला चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्य रमाकांत गुप्ता यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उघडकीस आणला. शिवाजीनगर बसडेपोत ४० गन पॉइंट असून एकाची किंमत दीड लाखापर्यंत आहे. शिवाजी नगर बस डेपोत असे प्रकार घडत असल्याने बेस्ट उपक्रमाच्या बसडेपोतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Swapnil S

मुंबई : गोवंडी शिवाजीनगर डेपोत १० चार्जिंग गन पॉइंटला चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्य रमाकांत गुप्ता यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उघडकीस आणला. शिवाजीनगर बसडेपोत ४० गन पॉइंट असून एकाची किंमत दीड लाखापर्यंत आहे. शिवाजी नगर बस डेपोत असे प्रकार घडत असल्याने बेस्ट उपक्रमाच्या बसडेपोतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, डेपोजवळ उंच कंपाऊंड वॉल उभारण्यात यावी आणि १५ दिवसांत याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या बस आगारात चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत.

गोवंडी येथील शिवाजीनगर बस डेपोत इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करण्यासाठी ४० चार्जिंग गन पॉइंट बसवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी १० चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत उघडकीस आणला. डेपोजवळ कंपाऊंड वॉल असून ती पार करून मुले गन पॉइंट चोरी करण्यासाठी डेपोत येतात. त्या मुलांना गन पॉइंट चोरी करताना रोखले तर चोरी करणारे सुरक्षारक्षकावर दगडफेक करत असल्याचा प्रकार घडतो, असेही ते म्हणाले.

शिवाजीनगर बसडेपो बेस्ट उपक्रमाची जागा असली तरी टाटा मोटर्सच्या बसेस असल्याने देखभाल टाटा मोटर्स कंपनी करते. याठिकाणी सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ करा, अशी सूचना टाटा मोटर्स कंपनीला केली आहे. तसेच कंपाऊंड वॉलची उंची वाढवण्यात यावी, पुढील १५ दिवसांत याप्रकरणी ॲॅक्शन घेण्यात येईल, असे सोनिया सेठी यावेळी म्हणाले.

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्राचा आंदोलनाचा इशारा

नागरिकांना जमिनीच्या मोबदल्याशिवाय वंचित ठेवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हे तत्काळ दाखल करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश; ८७ हजार अवैध जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड, चौकशीसाठी SIT स्थापन

Mumbai : आरोग्य सेवेतील खासगीकरणाचा हट्ट कायम; पालिका रुग्णालयांतील सफाईसाठी १०१ कोटींचे कंत्राट

Mumbai : अंधेरी सब-वे ‘उड्डाणपूल’ अशक्य; सल्लागाराचा मुंबई महापालिकेला अहवाल सादर