Mumbai : सुधार, बेस्ट समितीवर शिंदे सेनेचा वरचष्मा; बेस्ट समितीवर तृष्णा विश्वासराव, सुधार समितीवर संध्या दोशी बिनविरोध  Photo : X (mybmc)
मुंबई

Mumbai : सुधार, बेस्ट समितीवर शिंदे सेनेचा वरचष्मा; बेस्ट समितीवर तृष्णा विश्वासराव, सुधार समितीवर संध्या दोशी बिनविरोध

मुंबई महापालिकेतील सुधार समिती व बेस्ट समितीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे. सुधार समिती अध्यक्षपदी शिंदे गटाच्या नगरसेविका संध्या दोशी यांची तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुठल्याही पक्षाच्या वतीने अर्ज दाखल न केल्याने दोन्ही निवडणुकी बिनविरोध झाल्या.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेतील सुधार समिती व बेस्ट समितीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे. सुधार समिती अध्यक्षपदी शिंदे गटाच्या नगरसेविका संध्या दोशी यांची तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुठल्याही पक्षाच्या वतीने अर्ज दाखल न केल्याने दोन्ही निवडणुकी बिनविरोध झाल्या.

२०२६-२७ वर्षांसाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या तृष्णा विश्वासराव बिनविरोध विजयी झाल्या. तृष्णा विश्वासराव प्रभाग क्रमांक १८० (गणेश नगर, वडाळा, अँटॉप हिल) च्या नगरसेविका असून त्या १९९७ ते १९९९ पर्यंत महापौर परिषद कालावधीमध्ये बेस्ट समिती सदस्या होत्या. तसेच २०१४ ते २०१७ पर्यंत मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या होत्या. सध्या शिवसेना उपनेत्या म्हणून त्या कार्यरत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी उपस्थित होत्या.

बेस्ट, मेट्रो, मोनो, लोकल ट्रेनसारखे पर्याय एकमेकांशी जोडा - तृष्णा विश्वासराव

मुंबई शहर भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात पार्किंगकरिता मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग ही काळाची गरज आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीचे सर्व पर्याय एकमेकांशी जोडणे महत्त्वाचे ठरणार आहेत म्हणून त्यादृष्टीने योग्य त्या ठोस उपाययोजना बेस्ट उपक्रमाच्या समितीमार्फत केल्या जातील, असे निर्देश बेस्ट समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट