Mumbai : सीसी रस्त्यांसाठी आणखी ६,६०० कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सीसी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : सीसी रस्त्यांसाठी आणखी ६,६०० कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सीसी

मुंबईकरांना खड्डेमुक्त आणि दीर्घकालीन टिकाऊ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांना खड्डेमुक्त आणि दीर्घकालीन टिकाऊ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्यात ३११ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ६ हजार ६०० कोटी खर्च केले जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील कामाला जानेवारी २०२७ पासून सुरुवात करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, पालिका आयुक्तांनी रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

सध्या शहरात सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचे पहिले आणि दुसरे टप्पे सुरू असून त्याअंतर्गत २ हजार १७९ रस्त्यांचे, म्हणजेच ७१५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १ हजार ५८९ रस्त्यांवरील कामे पूर्ण झाली असून ३१६ कामे अंशतः पूर्ण झाली आहेत.

दोन फेजचा खर्च १७ हजार कोटी

पहिला आणि दुसरा टप्पा मिळून सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पावर सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च होत असून तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील बहुतांश प्रमुख रस्ते कायमस्वरूपी काँक्रीटचे होणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

साबण, शाम्पू आणि टूथपेस्टवर आता 'शाकाहारी', 'मांसाहारी' चिन्ह अनिवार्य; केंद्र सरकारचा नवा नियम

Mumbai : 'गॅलॉप्स' सह ५ रेस्टॉरंट्सचे परवाने केले निलंबित

फाळके पुरस्काराने अनंत नाग सन्मानित; कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण