संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : नालेसफाई पाहणी दौऱ्यावरून भाजप-शिंदे गट आमनेसामने; महापौरांच्या दौऱ्यानंतर आता उपमहापौरांचे दौरे

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण व्हावी, यासाठी महापौर रितू तावडे यांनी नालेसफाईच्या कामाचे पाहणी दौरे सुरू केले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक तथा उपमहापौर संजय घाडी यांना या दौऱ्यांबाबत माहिती न देता हे दौरे केले जात असल्याने शिंदे सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण व्हावी, यासाठी महापौर रितू तावडे यांनी नालेसफाईच्या कामाचे पाहणी दौरे सुरू केले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक तथा उपमहापौर संजय घाडी यांना या दौऱ्यांबाबत माहिती न देता हे दौरे केले जात असल्याने शिंदे सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनीही नालेसफाई पहाणी दौरे आयोजित केले आहेत.

वरुणराजाचे आगमन दीड महिन्यांवर येऊन ठेपले आहे. त्यात यंदा नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही, याची काळजी घेतली जात असून महापौर रितू तावडे यांनी नालेसफाईच्या कामाची पहाणी करण्यासाठी दौरे सुरू केले. मात्र, नालेसफाईच्या कामाची पहाणी दौरे आयोजित करताना उपमहापौर संजय घाडी यांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याने शिंदे सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नालेसफाई : वर्षभरातील एक महत्त्वाचा मुद्दा

मुंबई महापालिकेच्या एका महत्त्वाच्या कामापैकी नालेसफाई ही एक महत्त्वाचे काम मानले जाते. मुंबई आणि मुंबईकरांना पाणी साचण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेचे कंत्राटदार मुंबईतील नदी आणि नाल्यातून गाळ काढून खोलवर सफाई करतात. त्यांच्या कामावर पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ‌ठेवतात. अलीकडेच अतिरिक्त आयुक्त, पालिका आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पाहणी दौरे करून कामाचा आढावा घेतला होता. २ मे ला एम पश्चिम वॉर्डमधील चेंबूर पूर्व भागासह कुर्ला पूर्व एल वॉर्ड, एफ-उत्तर वॉर्डमधील वडाळा, वांद्रे-कुर्ला संकुल येथील मिठी नदी, तर ५ मे ला एस वॉर्डमधील भांडुप पूर्व, टी वॉर्डमधील मुलुंड पूर्व, एम-पश्चिम वॉर्डमधील घाटकोपर भागातील नालेसफाई कामांची पाहणी केली. याशिवाय ८ मे ला पश्चिम उपनगरातील महापालिका परिमंडळ ३, ४ आणि परिमंडळ ७ मधील नालेसफाई पाहणीचा दौरा आयोजित केला आहे. मात्र, त्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी उपमहापौर संजय घाडी उपस्थित नव्हते.

उपमहापौर आज करणार दौरा

उपमहापौर संजय घाडी हे परिमंडळ ७ मधील आर उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक आहेत. मात्र, कोणत्याही दौऱ्याबाबत त्यांना महापौर कार्यालयाकडून कल्पनाच देण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षातील सर्व नगरसेवक आणि उपमहापौर घाडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. उपमहापौर गुरुवार, ७ मे रोजी कुर्ला एल वॉर्डमधील मिठी नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्याची पाहणी करणार आहेत. दरम्यान, नालेसफाई हा भाजप आणि शिंदे गटात वादाचा मुद्दा ठरला असून महापालिकेतील इतर अनेक मुद्द्यांबाबत खटके उडण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग