मुंबईत महिला उमेदवारांचा बोलबाला; सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार रिंगणात; देवनार, चेंबूरमध्ये ६८ महिला उमेदवार प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत महिला उमेदवारांचा बोलबाला; सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार रिंगणात; देवनार, चेंबूरमध्ये ६८ महिला उमेदवार

पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून राजकारणात ही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार असून देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजी नगर, गोवंडी या प्रभागातून तब्बल ६८ महिला उमेदवार आपले राजकीय नशीब आजमवत आहेत.

Swapnil S

मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून राजकारणात ही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार असून देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजी नगर, गोवंडी या प्रभागातून तब्बल ६८ महिला उमेदवार आपले राजकीय नशीब आजमवत आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपलेइ उमेदवार निवडणु-कीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना प्राधान्य दिले असून महिला उमेदवार ही रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २ जानेवारी शेवटची तारीख होती. २ जानेवारीपर्यंत ४५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात पुरुष २२० तर २२३ महिलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईत १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु १७०० पैकी ८७९ महिला उमेदवार असून ८२१ पुरुष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

मुंबईत २२७ प्रभागात निवडणु-कीचा सामना रंगणार असून २२७पैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या जादा असल्याने मुंबईत महिला राज असणार आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

७१ टक्के मुंबईकर घेत आहेत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे

NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Mumbai : नाल्यात कचरा फेकला तर कारवाई; वाहनांवर जीपीएससह CCTV ची नजर