Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ५५ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. फेरीवाल्यांसाठी ओळखपत्र बनवण्यासाठी तब्बल पावणेदोन कोटींचा खर्च करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ५५ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. फेरीवाल्यांसाठी ओळखपत्र बनवण्यासाठी तब्बल पावणेदोन कोटींचा खर्च करण्यात आला असून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेच्या वतीने पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. मुंबईतील फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईनंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटला गेला.

या प्रकरणात फेरीवाल्यांच्या काही संघटना न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी करताना न्यायालयाने निर्देश देत ज्यांची मुंबई महापालिका हद्दीतील सर्वेक्षणात नोंद झाली आहे, अशा एकूण ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांना क्यूआर कोडसहित ओळखपत्र देण्यास महापालिकेला सांगितले होते.

एका ओळखपत्रासाठी १६८ रुपये खर्च

एका ओळखपत्रासाठी १६८ रुपये मोजले जात असून ९९ हजार ४३५ ओळखपत्रांसाठी १ कोटी ६७ लाख ५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी डॅक्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे; नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना

­सत्तेत एकत्र, पण कारभारावरून संघर्ष! पाणीपुरवठा प्रकरणावरून सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप-शिंदे सेना आमनेसामने