Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई  
मुंबई

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबई पालिकेच्या ‘एफ’ दक्षिण विभागातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यात आले. तेथील बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवण्यात आले. ‘एफ’ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मुंबई पालिकेच्या ‘एफ’ दक्षिण विभागातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यात आले. तेथील बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवण्यात आले. ‘एफ’ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ‘एफ’ दक्षिण विभागात अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वृषाली इंगुले यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ‘एफ’ दक्षिण विभागाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत पदपथ व रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे केले. बीट क्रमांक २०३ व २०४ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर, तर बीट क्रमांक २०२ व २०३ मधील ई. बोर्जेस मार्गावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली.

पदपथ नागरिकांसाठी केला मुक्त

या कारवाईदरम्यान रस्ता व पदपथांवर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर तसेच विविध साहित्य हटवून जप्त करण्यात आले. महापालिकेच्या पथकाने पदपथांवरील अडथळे दूर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला. अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत पदपथ नागरिकांसाठी मुक्त करण्यावर भर दिला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'उंच' नव्हे, 'उन्नत' गणेशोत्सव हवा...

आजचे राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डाळ भिजवायची झंझट नको! झटपट करा कुरकुरीत सोयाबीन मेदूवडा, चहासोबत लागेल मस्त

रात्री झोपण्यापूर्वी 'या' ३ चुका करू नका; त्वचेचं होईल नुकसान

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती