वैद्यकीय उपचारासाठी २७० कोटींची मदत; ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; BMC ची वैद्यकीय गटविमा योजना ठरली जीवनदायी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

वैद्यकीय उपचारासाठी २७० कोटींची मदत; ४० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; BMC ची वैद्यकीय गटविमा योजना ठरली जीवनदायी

मुंबई पालिकेतील ४० हजार ३३० कर्मचाऱ्यांना वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गत रुग्णालयीन उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई पालिकेतील ४० हजार ३३० कर्मचाऱ्यांना वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गत रुग्णालयीन उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. ज्या रुग्णालयात कर्मचारी उपचारासाठी दाखल त्या रुग्णालयात अथवा ज्या कर्मचाऱ्यांनी आधी पैसे खर्च केले त्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०२४ ते आतापर्यंत २७० कोटींची मदत करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्यासाठी २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीसाठी वैद्यकीय गटविमा सुरु होती. तिस-या वर्षी म्हणजे २०१७-१८ या वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जास्त पैशाची मागणी केली. याबाबत झालेल्या चर्चेत कंपनीची मागणी पूर्ण करण्यास पालिका प्रशासन सकारात्मक नसल्याचे लक्षात आल्यावर ही योजना पुढे तिसऱ्या वर्षी सुरू ठेवण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे पुढे गटविमा योजना बंद करण्यात आली.

गटविमा योजना बंद केल्याने कोरोना काळात कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दमछाक झाल्याचे कामगार संघटनांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गटविमा योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली होती. अखेर ऑक्टोबर २०२४ पासून वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जो कर्मचारी पालिकेच्या सेवेत त्या कर्मचाऱ्याची पत्नी, मुले, आई वडील किंवा सासू सासरे यापैकी आई वडील किंवा सासू सासरे याच लोकांना योजनेचा लाभ दिला जात आहे.

वैद्यकीय गटविमा योजना बंद झाल्यानंतर पैसे परत मिळतील या आशेने कर्मचा-यांनी वैद्यकीय उपचारावर लाखो रुपये खर्च केले होते. कर्मचाऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन उपचाराचा खर्च भागवला. ही योजना बंद झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना अडचणी येऊ लागल्या होत्या. अखेर आता वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू केल्याने पालिकेतील ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, वैद्यकीय गटविमा योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना लाभ मिळत असून संबंधित कंपनीला ३३८ कोटी रुपये आदा करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गिरगाव चौपाटीवर छठपूजेला परवानगी देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा तातडीचा दिलासा नाही

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

नंदीग्राम फाईल्स पुन्हा उघडणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

अमेरिका पाकिस्तानमध्ये राजदूत नेमणार; नताली बेकर यांची वर्णी लागणार? ट्रम्प यांनी केली शिफारस, सिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का