Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी तसेच सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी करूनही मुंबई पोलीस व पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची खंत मुंबई महापालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी व्यक्त केली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईतील उद्याने आणि मैदानांमध्ये असामाजिक तत्त्वांचा वाढता वावर, अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि दादागिरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी तसेच सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी करूनही मुंबई पोलीस व पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची खंत मुंबई महापालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी व्यक्त केली आहे. कुर्ला पश्चिमेकडील प्रमोद महाजन उद्यानातील घटनेनंतर पुन्हा एकदा संबंधित यंत्रणांना पत्र पाठवून कारवाईसाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत ३२५ उद्याने, ३६९ खेळाची मैदाने आणि ४८० मनोरंजन मैदाने आहेत. नागरिकांना मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे आणि हरित क्षेत्र जपणे हे महापालिकेचे धोरण असले, तरी या सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. उद्यानांमध्ये समाजविघातक कारवाया होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर हेतल गाला यांनी एप्रिल २०२६ मध्ये मुंबई पोलिसांना पत्र पाठवून उद्याने आणि मैदानांमध्ये सकाळी तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली होती. समाजविघातक कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

कंत्राटदारावर कारवाई करा

उद्यानांच्या देखभालीसाठी केअर टेकर नियुक्त करण्याची जबाबदारी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, केअर टेकरवर देखभालीसोबत सुरक्षेची जबाबदारी आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याने कंत्राटदारांच्या जबाबदारीचा आढावा घेण्याची मागणी होत आहे. कुर्ल्यातील घटनेनंतर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ठोस कारवाई करा

प्रमोद महाजन उद्यानाला संरक्षक कुंपण नसल्याने तेथेही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानाला लवकरच कुंपण घालण्याबाबत विचार केला जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसांत मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सुरक्षेसंदर्भात पुन्हा पत्र पाठवून ठोस कारवाईची मागणी करणार असल्याचे हेतल गाला यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार

महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत

पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला

Mumbai : 'हरितवारी जलतिरी' प्रकल्प अंधारात; सायकल ट्रॅक, पदपथांवरील बत्तीगुल

भाजप, आरएसएस असभ्य - राहुल गांधी