Mumbai : पालिकेचे स्टॉल्स भाऊ-बहिणीच्या नावे नाहीच 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पालिकेचे स्टॉल्स भाऊ-बहिणीच्या नावे नाहीच

मुंबई महापालिकेचे अविवाहित व्यक्तीच्या नावे असेल तर ते स्टॉल त्या व्यक्तीच्या आई-वडिलांच्या नावे होतील.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेचे अविवाहित व्यक्तीच्या नावे असेल तर ते स्टॉल त्या व्यक्तीच्या आई-वडिलांच्या नावे होतील. मात्र, त्या व्यक्तीच्या भाऊ किंवा बहिणीच्या नावे होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेने स्टॉल्स, इत्यादींचे परवाने हस्तांतरित करण्यासंबंधातील विद्यमान धोरणांत अविवाहित परवानाधारकाचे वारस म्हणून प्रथम त्यांचे आई, वडील आणि ते हयात नसल्यास किंवा ते काम करण्यास असमर्थ असल्यास त्या अविवाहित परवानाधारकाची बहीण व भाऊ यांचा अंतर्भाव करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मुंबईमध्ये

दोन बाय एक मीटर क्षेत्रफळाचे स्टॉल्स चालवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवाने देण्यात आलेले आहेत. असे व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकाचे निधन झाल्यास किंवा तो काम करण्यास असमर्थ ठरल्यास त्या परवान्याचे हस्तांतरण केवळ त्याच्या वारसाच्या म्हणजे पती, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे करता येईल, असे महापालिकेचे धोरण आहे.

बहीण, भावाचा धोरणात समावेश नाही

पालिका प्रशासनाच्यावतीने माहिती देताना स्टॉल्सचा परवाना हा स्टॉल्सधारकाला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत परवान्यांचे हस्तांतरण हे कायदेशीर वारसा नावाने सांगण्यात येते. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवान्यांचे हस्तांतरण हे स्टॉल्सधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ असल्यास त्यांचे कायदेशीर नवरा, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे करण्यात येते. पण परवानाधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ झाल्यास नमूद केलेले वारस नसल्यास त्यांच्या आई, वडिलांच्या नावे करण्यासाठीचे परिपत्रक महापालिकेच्या वतीने बनवून आयुक्तांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात आले आहे. मात्र, अविवाहित परवानाधारकांची बहीण व भाऊ यांच्या या धोरणात अंतर्भाव करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के

मुंबई विभागाचा निकाल घसरला; यंदाचा सर्व शाखांचा निकाल ९०.०८ टक्के, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.८५ टक्के घट

'लालपरी'चा प्रवास महागणार; सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार, शौचालये मोफत