Mumbai : आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; पालिका मुख्यालयातील भाजप कार्यालयात मशीन कार्यान्वित 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; पालिका मुख्यालयातील भाजप कार्यालयात मशीन कार्यान्वित

सर्वपक्षीय नगरसेवकांना शिस्त लागावी, यासाठी आता मुंबई महापालिका मुख्यालयात येणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : सर्वपक्षीय नगरसेवकांना शिस्त लागावी, यासाठी आता मुंबई महापालिका मुख्यालयात येणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. भाजपचे कुलाबा येथील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापौर रितू तावडे यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी, असे पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पक्षकार्यालयात भाजप नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्यात आली आहे.

बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक या निर्णयामुळे बीएमसीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. आपण बीएमसीमधील आपल्या कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली यशस्वीपणे लागू केली आहे. यामुळे उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे शक्य झाले असून नगरसेवकांमध्ये शिस्तही निर्माण झाली आहे. याच धर्तीवर सर्वसाधारण सभेसाठीही अशीच प्रणाली लागू करणे योग्य ठरेल, असे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

अशा उपाययोजनांमुळे नगरसेवकांमध्ये वक्तशीरपणा आणि सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल, तसेच पारदर्शक प्रशासनामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. ज्या काळात नागरिक आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करत आहेत, त्या काळात हे पाऊल सुशासनासाठी आपली बांधिलकी दर्शवेल, असेही त्यांनी नमूद केले.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं