Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडिस अळ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे.

Swapnil S

मुंबई : डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडिस अळ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. पांडुरंग तोडकर (४७) हे डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी करण्यासाठी भोईवाडा बीडीडी चाळीतील एक मजली इमारतीवर गेले असता खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. भोईवाडा बीडीडी चाळीतही डेंग्यूच्या प्रजननस्थळांची तपासणी मोहीम करताना शनिवारी दुपारी २.५५ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.

रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू

तोडकर हे महापालिकेच्या पीसीओ विभागात कार्यरत होते. डेंग्यूच्या प्रजननस्थळांची पाहणी टेरेसवर गेले होते. पाहणी सुरू असताना ते अचानक खाली पडले. त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात

Thane : टीएमटीचा ११ वर्षानंतर भाडेवाढीचा प्रस्ताव; पहिल्या टप्प्यासाठी २ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता

Kalyan : वकिलाची थकीत फी अखेर वसूल; ३५ हजार रुपये व ६ टक्के व्याज देण्याचा न्यायालयाचा आदेश

Thane : भाजप नगरसेवकाच्या कन्येची फसवणूक; सेलिब्रिटी प्रमोशनच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा