Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत 
मुंबई

Mumbai : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. भारतीय नागरिक परदेशात नियम पाळतात, मग मायदेशात नियम धाब्यावर का बसवतात, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. टीएमटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना वाढीव नुकसानभरपाई मंजूर करताना न्यायालयाने वाहतूक नियमांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले.

९ नोव्हेंबर २०१२ रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा १६ मार्च २०१३ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबीयांना १३.२३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती. भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'

निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द; दुरुस्तीसाठी नवे कडक नियम

महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना; समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती