मुंबई

गुंतवणुकीच्या नावाखाली ५.२४ कोटींची फसवणूक

दुबईस्थित गुंतवणूक कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यावसायिकाला तब्बल ५.२४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

Swapnil S

मुंबई : दुबईस्थित गुंतवणूक कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यावसायिकाला तब्बल ५.२४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

आरोपींनी पीडित व्यावसायिकाला दुबईला बोलावले होते. मात्र तेथे गेल्यावर त्याला अशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे आढळले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या व्यावसायिकाच्या लक्षात आले.

चौकशीत उघड झाले की, अलीकडे देशाच्या विविध भागांतून पकडलेल्या या आरोपींनी याच पद्धतीने बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे आणि केरळ येथे ६५ कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, तिघा आरोपींची ओळख पटली असून त्यात आर. मेनन (३५), मणिकंदन (३२) आणि एच. पांडी यांचा समावेश आहे. यातील एक आरोपी अद्याप फरारी असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन