संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल.

माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या लोकल पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने नियोजित ठिकाणी पोचतील.

हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द आणि पनवेल ते नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास