मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेवर साखळी ओढण्याच्या सहा घटना; मेल-एक्स्प्रेससह लोकल विस्कळीत

दिवाळीच्या सुट्टयांच्या गर्दीत मध्य रेल्वेवर रविवारी चेन पुलिंगच्या (साखळी ओढण्याच्या) तब्बल सहा घटना घडल्या. यामुळे संपूर्ण उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या घटनांमुळे पाच मेल-एक्स्प्रेस आणि एक उपनगरीय लोकल गाड्या खोळंबल्या, तर अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या.

Swapnil S

मुंबई : दिवाळीच्या सुट्टयांच्या गर्दीत मध्य रेल्वेवर रविवारी चेन पुलिंगच्या (साखळी ओढण्याच्या) तब्बल सहा घटना घडल्या. यामुळे संपूर्ण उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या घटनांमुळे पाच मेल-एक्स्प्रेस आणि एक उपनगरीय लोकल गाड्या खोळंबल्या, तर अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या. तसेच प्रवाशांच्या गैरसोयीमुळे एक ठाणे-कल्याण लोकल रद्द करावी लागली. अंबरनाथ, टिटवाळा आणि कसारा दिशेने जाणारी वाहतूकही या घटनांमुळे विस्कळीत झाली.

गाड्यांवर परिणाम

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, चेन पुलिंगची घटना केवळ संबंधित ट्रेनपुरती मर्यादित राहत नाही. जेव्हा एखादी गाडी अचानक थांबवली जाते, तेव्हा तिच्या मागे येणाऱ्या इतर गाड्यांनाही रोखावे लागते. त्यामुळे संपूर्ण विभागावर त्याचा कॅस्केडिंग (साखळी) परिणाम होतो. विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते, तेव्हा ही समस्या अधिक आव्हानात्मक ठरते.

विविध विभागांमधील घटना

इतर घटना वेगवेगळ्या विभागांत नोंदवण्यात आल्या. लोकमान्य टिळक टर्मिनस-अमृतापूर सुपरफास्ट एक्सप्रेस (२०१०३) मध्ये चैन पुलिंग झाल्यामुळे ती एलटीटी आणि विद्याविहार दरम्यान पहाटे ५:२७ ते ५:४१ वाजेपर्यंत थांबवण्यात आली होती. याचा फटका अंबरनाथ, टिटवाळा आणि कसारा लोकल सेवांना बसला तसेच एलटीटी-मऊ एक्स्प्रेस (१५१८२) दुपारी १२:३४ ते १२:४७ दरम्यान कल्याण आणि शहाड दरम्यान रोखण्यात आली. दरम्यान, एका टिटवाळा-सीएसएमटी लोकलला सकाळी ९:१८ ते ९:२२ दरम्यान विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान थांबवण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर कर्मचाऱ्याचे निलंबन गृहित धरले जाईल - सर्वोच्च न्यायालय

Thane : आठ महिन्यांपासून बंद असलेली ABG मशीन अखेर सुरू; शिवाजी महाराज रुग्णालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत मुंबईत पहिला गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप

ठाणे, नवी मुंबईत रॉकेट फटाक्यांना बंदी; ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश

Mumbai : कन्व्हेयन्स डीड करून देण्याचे बिल्डरला आदेश; कांदिवलीच्या गृहनिर्माण संस्थेला न्यायालयाचा दिलासा