मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवर आता त्वरित वैद्यकीय मदत! १८ ठिकाणी सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; 'या' ठिकाणी मिळणार त्वरित मदत

मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ही गर्दी, धावपळ आणि ताणतणावामुळे अनेकदा अचानक आजारपण, अपघात किंवा हृदयविकाराचे झटका येणे यांसारख्या गंभीर परिस्थिती निर्माण होतात. अशा प्रसंगी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक ठरते.

Mayuri Gawade

मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ही गर्दी, धावपळ आणि ताणतणावामुळे अनेकदा अचानक आजारपण, अपघात किंवा हृदयविकाराचे झटका येणे यांसारख्या गंभीर परिस्थिती निर्माण होतात. अशा प्रसंगी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक ठरते. ही गंभीर गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई विभागातील उपनगरी स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (Emergency Medical Rooms) उभारण्याची उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या कक्षांमुळे प्रवाशांना स्थानक परिसरातच त्वरित प्राथमिक उपचार, ऑक्सिजन सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. अपघात किंवा अचानक आजारपणाच्या प्रसंगी रुग्णवाहिका येण्याआधीच रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यास ही सुविधा मदत करणार आहे.

आपत्कालीन वैद्यकीय कक्षांमध्ये असणाऱ्या सुविधा

  • प्राथमिक उपचार आणि प्राथमिक वैद्यकीय मदत

  • ऑक्सिजन सुविधा

  • स्ट्रेचर आणि मूलभूत लाइफ सपोर्ट उपकरणे

  • प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी

यामुळे गर्दीच्या उपनगरी मार्गावर अपघात, हृदयविकाराचे झटके किंवा अचानक उद्भवणाऱ्या आजारांच्या घटनांमध्ये प्रतिसादाचा वेळ कमी होणार आहे, आणि गंभीर परिस्थितीत प्रवाशांचे जीव वाचवण्यास मदत होईल.

पहिल्या टप्प्यात १० स्थानके निश्चित

ई-लिलाव प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून खालील १० महत्त्वाच्या स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहेत:

  • कळवा

  • टिटवाळा

  • कर्जत

  • कुर्ला

  • ठाणे

  • मुंब्रा

  • घाटकोपर

  • चेंबूर

  • मानखुर्द

  • लोकमान्य टिळक टर्मिनस

दुसऱ्या टप्प्यात आणखी ८ स्थानके

पुढील ८ स्थानकांसाठी लवकरच ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे:

  • कसारा

  • दादर

  • डोंबिवली

  • सायन

  • विक्रोळी

  • भांडुप

  • दिवा

  • इगतपुरी

दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरी मार्गावरील मोठ्या भागात स्थानकांवरच तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला मोठा दिलासा मिळेल.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा