Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही उपनगरीय सेवा वळविण्यात येणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगा ब्लॉक राहील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा-मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबतील व पुढे पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल सुमारे १५ मिनिटे उशिरा धावतील.

तसेच ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील व पुढे माटुंगा येथे पुन्हा धीम्या मार्गावर येतील. या सेवादेखील सुमारे १५ मिनिटे उशिरा धावतील. ब्लॉकदरम्यान विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर अप व डाऊन दोन्ही दिशेतील उपनगरीय गाड्यांना थांबा दिला जाणार नाही. तसेच सीएसएमटी येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना अन्य मार्गावर प्रवासाची विशेष परवानगी

पनवेल, बेलापूर व वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर सेवा सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० दरम्यान रद्द राहतील. तसेच गोरेगाव व वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप सेवा सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून दर २० मिनिटांनी विशेष सेवा चालविण्यात येतील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन व पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.

Mumbai : धारावीतील झोपडीधारकांची पात्रता लवकरच निश्चित होणार; धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग, लवकरच मास्टर प्लॅनला मंजुरी

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांचा ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणा, विक्रमवीर रिता शेर्पा यांची मागणी

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच

UPSC 2027 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर