CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आजपासून सीएनजीचे नवे दर लागू झाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीची घोषणा केली असून आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार आणि दरवाढीचे कारण काय? जाणून घ्या...

Mayuri Gawade

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात किलोमागे १ रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या भागांत आता सीएनजीसाठी किलोमागे ८९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवे दर ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

CNG महागण्यामागचं कारण काय?

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गॅस आणि आयात करण्यात येणाऱ्या री-गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या (RLNG) किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सीएनजी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या गॅसच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे MGLने म्हटले आहे.

सीएनजीसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचा मोठा हिस्सा आयात केलेल्या RLNG मधून मिळतो. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांशी जोडलेली असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसचे दर वाढल्यामुळे कंपनीचा खर्चही वाढला आहे.

MGL ने काय म्हटलं?

वाढलेल्या खर्चाचा काही भाग भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना सीएनजीचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात किलोमागे १ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे MGLने स्पष्ट केले आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या खर्चात वाढ

मुंबईत टॅक्सी, रिक्षा, बस तसेच मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांसाठी सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम वाहनचालकांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. विशेषतः रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा इंधनावरील खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम पुढे प्रवास खर्चावरही होण्याची शक्यता आहे.

MGL मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लातूर आणि धाराशिवसह विविध भागांत गॅसचा पुरवठा करते. कंपनीच्या ५०० हून अधिक सीएनजी स्टेशनच्या नेटवर्कद्वारे १३ लाखांहून अधिक वाहनांना सीएनजी पुरवला जातो. तसेच सुमारे ३२ लाख घरांना PNG कनेक्शन देण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

Mumbai : गर्दीच्या ठिकाणीच कचरापेट्या; GI पद्धतीने होणार जागा निश्चिती; २३ वॉर्डांत ठराविक अंतरावर डबे बसवण्याचे नियोजन

Thane : पूर्णेकरची हत्या, मित्राला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा, अन्य आरोपींचा शोध सुरू