Mumbai : कोस्टल रोडच्या दोन फ्लड गेट्सचे नुकसान; समुद्राच्या लाटा धडकल्या; आराखड्यात तांत्रिक त्रुटी 
मुंबई

Mumbai : कोस्टल रोडच्या दोन फ्लड गेट्सचे नुकसान; समुद्राच्या लाटा धडकल्या; आराखड्यात तांत्रिक त्रुटी

पावसाळ्यात कोस्टल रोडवर पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोस्टल रोडवर विविध ठिकाणी १५ फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत. मात्र दोन फ्लड गेट्सचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने समुद्राच्या लाटांच्या धडकेत दोन फ्लड गेट्सचे नुकसान झाले आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात कोस्टल रोडवर पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोस्टल रोडवर विविध ठिकाणी १५ फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत. मात्र दोन फ्लड गेट्सचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने समुद्राच्या लाटांच्या धडकेत दोन फ्लड गेट्सचे नुकसान झाले आहे. आता इंदूर येथे यशस्वी झाल्यावरच दोन ठिकाणी नवीन फ्लड गेट्स बसवण्यात येणार आहेत.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला आहे‌. मार्च २०२४ मध्ये कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आणि वांद्रे सी-लिंक ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. कोस्टल रोडवर वाहनचालकांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. विशेषतः पावसाळ्यात कोस्टल रोडवर पाणी साचू नये, यासाठी ठिकठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले आहेत. तर १५ ठिकाणी फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत.

कोस्टल रोडवर विशेषतः पावसाळ्यात पाणी साचू नये, पाणी साचले तर तातडीने उपसा करणे शक्य व्हावे, यासाठी एकूण १५ फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत. सागरीकिनारा प्रकल्प हा समुद्राला लागूनच असल्याने या प्रकल्पांतर्गत ही सुविधा अंतर्भूत आहे. २०२५ च्या पावसाळाआधी ही कामे पूर्ण करण्यात आली. फ्लड गेट्सच्या माध्यमातून समुद्राचे पाणी भरतीच्या काळात रोखण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. १५ फ्लड गेट्सपैकी दोन गेट हे समुद्राच्या दिशेने ६५ मीटर आत आहेत.

निकृष्ट दर्जाचे गेट्स

या दोन फ्लड गेटची दिशा योग्य आहे. मात्र फ्लड गेट्सचा आराखडाच चुकला असून हे गेट निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी हे गेट नव्याने बसवण्याचा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ई-टीडीआर नोंदणी बंधनकारक; चोरीच्या टीडीआर खरेदीला बसणार लगाम

Mumbai : गारगाईसाठी स्पेन, इटली, जपानच्या कंपन्यांची धाव; प्रकल्पावर तज्ज्ञ सल्लागारांचा वॉच

अखेर बिहारही भाजपकडे; सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ

मुंबईत उकाडा वाढला; यलो अलर्ट जारी

अमरावतीत १८० तरुणींचे लैंगिक शोषण; आरोपी मोहम्मद अयाजला ठोकल्या बेड्या; ३५० अश्लील व्हिडीओ व्हायरल