मुंबई

Mumbai: त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती २८ नोव्हेंबरला मुंबईत

मुंबई जिल्हा भेटीसाठी समिती २८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संबंधित सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरिता समिती राज्यातील विविध विभाग/जिल्हा स्तरावर भेटी देत असून मुंबई जिल्हा भेटीसाठी समिती २८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संबंधित सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

या भेटीदरम्यान ही समिती सामान्य नागरिक, भाषातज्‍ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय/ खासगी संस्था यांचे अध्यक्ष/ सदस्य, राजकीय पक्षांचे नेते/ लोकप्रतिनिधी, प्राथमिक/ माध्यमिक, शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष सदस्य, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते इत्यादींबरोबर संवाद साधणार असून त्रिभाषा धोरणासंदर्भात त्यांची मते व विचार जाणून घेणार आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे मुंबई जिल्ह्याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ वाजता ऑनलाईन व्ही.सी. द्वारे ठाणे/ रायगड/ पालघर या जिल्ह्यांकरिता संवाद साधला जाणार आहे. त्याकरिता प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आलेली आहे.

मुंबई विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या समन्वयाने हा दौरा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी व नियोजन करण्यात आले आहे. बैठकीत सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका व नगरपालिका शिक्षण मंडळांचे प्रशासनाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक तज्‍ज्ञ व्यक्तींना जिल्हास्तरीय चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर चर्चासत्रासाठी मुंबई जिल्ह्यातून सुमारे ३०० जणांचा सहभाग अपेक्षित आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?