Mumbai : त्याने २७ वर्षांनंतर उगवला 'फिल्मीस्टाईल'ने सूड; कुख्यात गुंड सादिक कालियाच्या पुतण्याला अटक X
मुंबई

Mumbai : त्याने २७ वर्षांनंतर उगवला 'फिल्मीस्टाईल'ने सूड; कुख्यात गुंड सादिक कालियाच्या पुतण्याला अटक

जवळपास तीन दशकांनंतर घेतलेल्या सूडाच्या एका धक्कादायक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एका २९ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. इक्बाल इब्राहिम सेलिया (७८) च्या हत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : जवळपास तीन दशकांनंतर घेतलेल्या सूडाच्या एका धक्कादायक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एका २९ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. इक्बाल इब्राहिम सेलिया (७८) च्या हत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शादिक जवार (२९) हा गुंड सादिक कालियाचा पुतण्या आहे. १९९९ मध्ये सादिक कालिया पोलीस चकमकीत मारला गेला होता. सेलिया यांनीच त्याच्या काकाबद्दल पोलिसांना टिप दिली होती, असा आरोपी जवार याला संशय होता. त्यामुळे जवारने इक्बाल इब्राहिम सेलिया यांची हत्या करण्याचा कट रचला.

तपासानुसार, 'एन्काऊंटर फेम' दया नायक यांना सेलिया यांनीच सादिक कालियाच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती दिली होती, ज्यामुळे कालियाचा मृत्यू झाला. याचा सूड उगवण्यासाठी जवारने हत्येचा कट आखला. २० एप्रिलच्या संध्याकाळी मुंबईतील नागपाडा येथील सेलिया यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. घरातील इतर सदस्य बाहेर असताना हल्लेखोरांनी घरात घुसून धारदार शस्त्रांनी वृद्धावर हल्ला केला. सेलिया यांच्या अंगावर २० पेक्षा जास्त वार करण्यात आले. त्यांची पत्नी आणि मुलगा घरी परतले तेव्हा सेलिया रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले.

हत्येच्या घटनेनंतर नागपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने माग काढत जवार आणि नौशाद मिथानी (२२) याला नागपूरमधून अटक केली.

काय आहे पार्श्वभूमी

पोलीस रेकॉर्डनुसार, सादिक कालिया हा सुरुवातीला मुंबईतील काळाचौकी भागात फेरीवाला होता, त्यानंतर तो छोटा शकील टोळीत सामील झाला. नोव्हेंबर १९९९ मध्ये एका पोलीस कारवाईत तो मारला गेला. त्याच्या मृत्यूवेळी जवार अवघ्या २ वर्षांचा होता, परंतु तो सूडाच्या भावनेनेच लहानाचा मोठा झाला, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२