मुंबई

Mumbai : मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर; माथेफिरूच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी

आज मुंबईतील (Mumbai) ग्रँट रोडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एका माथेफिरूने शेजारी राहणाऱ्या ५ जणांवर हल्ला केला. यामध्ये दोघांनाच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हल्ला करणारा आरोपी हा चेतन गाला असून तो ५० वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जणांमध्ये झालेल्या या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गाला याचे त्याच्या पत्नीसोबत वाद होत होते. त्याचे शेजारी चेतांविरोधात त्याच्या पत्नीला भडकवत असल्याचा संशय होता. शेजारी पत्नीला फूस लावतात म्हणून त्याने शेजाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ३ जण रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. चेतन गालाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!