मुंबई

अंधेरीत फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ ; खून झाला असल्याचा पोलिसांना संशय

नवशक्ती Web Desk

मुंबईतील अंधेरीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका फ्लॅटमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळून आली आहे. अंधेरीतील मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळ, एनजी कॉम्प्लेक्स, कृष्णलाल मारवाह मार्गावरील एका फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचं नाव रुपल ओग्रे ( वय २४) असं होतं. ही मृत महिला मुळची छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत ती महिला प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. एप्रिल महिन्यात ही मुलगी एअर इंडियात प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आली होती.

या महिलेचा मृतदेह ज्या फ्लॅटमध्ये आढळला त्या फ्लॅटमध्ये ती तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहत होती. त्या वेळी ते दोघेही वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. पोलिसानांनी त्यांना आज पहाटे या घटनेची माहिती दिली आणि ते मुंबईकडे निघाले. रुपलने रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर शेवटचे बोलली होती. त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. "आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत", असं DCP दत्ता नलावडे झोन 10 यांनी सांगितलं.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत