Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार 
मुंबई

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या निर्णयावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्यानंतर दादर रेल्वे स्थानकाला नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यात येणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी केला.

Swapnil S

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या निर्णयावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्यानंतर दादर रेल्वे स्थानकाला नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यात येणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक घेतली होती. या बैठकीत दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळाच्या अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

जोरदार गदारोळानंतर खुलासा

त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे होणार असे गृहीत धरले जात होते. या निर्णयावरून राजकीय पक्ष आणि समाज माध्यमात जोरदार गदारोळ उडाला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने आज ‘एक्स’ या समाजमाध्यमातून ट्विट करत दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार असल्याचा खुलासा करून वादावर पडदा टाकला आहे.

नामांतराची मागणी जुनीच

दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी जुनीच आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या कारकिर्दीत ही मागणी पहिल्यांदा पुढे आली होती. त्यानंतर सातत्याने महापरिनिर्वाण दिनाच्या आसपास दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ अशी करण्याची मागणी पुढे येते. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

लिफ्टच्या नियमांचे दरवाजे किलकिले