Mumbai : दहीहंडीसाठी रुग्णालये अ‍ॅलर्ट; जखमी गोविंदांना मिळणार तत्काळ उपचार प्रातिनिधिक फोटो | सलमान अन्सारी (FPJ)
मुंबई

Mumbai : दहीहंडीसाठी रुग्णालये अ‍ॅलर्ट; जखमी गोविंदांना मिळणार तत्काळ उपचार

शनिवारी मुंबईत साजरी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोविंदांना होणाऱ्या संभाव्य दुखापतींवर उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये १५० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : शनिवारी मुंबईत साजरी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोविंदांना होणाऱ्या संभाव्य दुखापतींवर उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये १५० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्कालीन, अस्थिव्यंगोपचार (ऑर्थोपेडिक) आणि ट्रॉमा केअर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांसह ‘केईएम’, ‘नायर’, ‘सायन’ आणि ‘कूपर’ या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये ही विशेष सोय करण्यात आली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे, इंजेक्शन, ड्रेसिंग साहित्य आणि पीओपीचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स-रे आणि सोनोग्राफी सुविधा सतत कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दहीहंडीदरम्यान अस्थिभंग आणि डोळ्यांना दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शस्त्रक्रिया, अस्थिव्यंगोपचार आणि नेत्रचिकित्सा विभागातील डॉक्टरांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. ‘केईएम’, ‘नायर’, ‘सायन’ आणि ‘कूपर’ रुग्णालयांत वैद्यकीय आपत्कालीन पथके तयार ठेवण्यात आली आहेत.

राज्य सरकारच्या ‘जेजे रुग्णालय’ समूहानेही स्वतंत्र व्यवस्था केली आहे. जखमी गोविंदांसाठी १० आयसीयू आणि ३० आपत्कालीन वॉर्ड खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी ३१८ गोविंदा जखमी

मागील दहीहंडी उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने गोविंदा जखमी झाले होते. २०२२ मध्ये २०० हून अधिक, २०२४ मध्ये २४५ आणि २०२५ मध्ये ३१८ गोविंदा जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य यंत्रणेकडून ही पूर्वतयारी करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

१० थरांसाठी गोविंदांची चुरस! मुंबई, ठाण्यातील दहीहंडीकडेही लक्ष

Maratha Reservation : उपोषण मागे घेण्यास मनोज जरांगेंचा नकार

लाडक्या बाप्पाचे पूजासाहित्य महागले; मुंबईसह कोकणात जाणाऱ्या भक्तांची खरेदीसाठी उडाली झुंबड; कापूर, धूप, अगरबत्ती, कंठीच्या दरात झाली १० ते १५ टक्क्यांची वाढ

मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक

Mumbai : ३० स्टॉल्सवर हातोडा; भायखळा, मुंबई सेंट्रलमध्ये 'पादचारी प्रथम'; नायर रुग्णालय मार्गावर २७ स्टॉल्सना नोटीस