Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

गणेशमूर्तीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या व धोकादायक पुलांवर भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी होऊ नये, यासाठी मनपाने आवाहन केले आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशमूर्तीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या व धोकादायक पुलांवर भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी होऊ नये, यासाठी मनपाने आवाहन केले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दहा जुन्या व धोकादायक पुलांचा यात समावेश आहे. यात घाटकोपर रेल्वे पूल, करी रोड रेल्वे पूल, चिंचपोकळी रेल्वे पूल, भायखळा रेल्वे पूल, पश्चिम रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल, ग्रँट रोड-चर्नी रोडदरम्यानचा फ्रेंच रेल्वे पूल, ग्रँट रोडजवळील कॅनेडी रेल्वे पूल, मुंबई सेंट्रलजवळील फॉकलंड रेल्वे पूल, महालक्ष्मी रेल्वे पूल, दादर टिळक रेल्वे पूल यांचा समावेश आहे. या पुलांवर अतिरिक्त वजन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती

विसर्जन स्थळी ३२६ निर्माल्य वाहन, डंपर सज्ज ठेवले आहेत. निर्माल्यातून अगरबत्ती तयार केली जाणार आहे, तर जे निर्माल्य अगरबत्ती बनवण्यासाठी योग्य नाही तर कंपोस्ट केले जाणार आहे.

भरतीच्या वेळी समुद्रकिनारी काळजी घ्या!

गणेशमूर्ती विसर्जनाच्या विविध दिवसांमध्ये समुद्राला मोठी भरती येणार असल्याने भाविकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी मंगळवारी दुपारी २.१० वाजता ३.९४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवशी १८ सप्टेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास, सहाव्या दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आणि सातव्या दिवशी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोठी भरती अपेक्षित आहे. अनंत चतुर्दशीला सकाळी ११.०३ वाजता तसेच रात्री साडेअकराच्या सुमारास मोठी भरती येणार आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश आणि स्टिंग रे या प्रजातींचा वावर वाढत असल्याने समुद्रात उतरताना मत्स्यदंशापासूनही सावध राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Sindhudurg : महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तावेजीकरण; 'Bappa.org' मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

Thane : गणरायाच्या स्वागतासाठी ठाणे जिल्हा सज्ज; १ लाख ८२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जनासाठी १९३ ठिकाणी व्यवस्था

रशियाची भारतातून विक्रमी इंधन आयात; युक्रेनच्या हल्ल्यांमुळे देशांतर्गत शुद्धीकरण क्षमता बाधित

Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम