प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

Mumbai : मे २०२६ पासून ‘देवनार वीज प्रकल्प’ होणार कार्यान्वित ; सात मेगावॉट वीजनिर्मिती करणार

मुंबई शहरसह पूर्व व पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमारे सात मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे.

Swapnil S

पूनम पोळ / मुंबई : मुंबई महापालिकेने वाढत्या कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी २०२२ साली देवनार क्षेपणभूमी वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला. तब्बल चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून येत्या मे २०२६ मध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस असल्याची माहिती पालिकेने दिली.

मुंबई शहरसह पूर्व व पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमारे सात मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पासाठी विंडो कंपोस्टिंग आणि भस्मीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, या प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स चेन्नई एमएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. हा करार एकूण १८ वर्षे ४ महिने कालावधीचा आहे. या कराराचा कालावधी ४ जून २०२२ पासून सुरू झाला आहे, तर या प्रकल्पाची एकूण किंमत १०२० कोटी रुपये इतकी आहे. यात कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या प्रकल्पातून दररोज आठ मेगावॉट प्रतिदिन वीज निर्मिती केली जाणार असून, १७ दशलक्ष युनिटपैकी ४२ दशलक्ष युनिट ऑपरेटरला देण्यात येईल व ५८ दशलक्ष युनिट पालिकेला वापरता येणार आहे.

पुढील सात महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित होणार - आयुक्त भूषण गगराणी

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ९ एकर जागेत ‘वेस्ट टू पॉवर प्लांट’ उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, पुढील सात महिन्यांत त्याचा वापर सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला पर्यावरण विभागाची परवानगी हवी होती. मागील अनेक दिवस परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता आठवडाभरापूर्वीच पर्यावरण विभागाने आम्हाला परवानगीचे पत्र पाठवले आहे. आता या प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

"प्रकल्पातून जी काही वीज निर्मिती होईल त्याचा वापर कुठे करायचा याचा अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर याचा निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकल्पाच्या बाजूलाच एका समूहाचा कॉरिडोर आहे. ही वीज तिकडे देखील फिरवली जाऊ शकते. त्या बदल्यात त्यांच्याकडून मोबदला घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठराव अथवा चर्चा झालेली नाही. सर्व परवानग्या मिळाल्या नंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल." - किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात