Mumbai : धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत उभारणीचे लक्ष्य 
मुंबई

Mumbai : धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत उभारणीचे लक्ष्य

मिठी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम वेगाने सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : मिठी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाची आतापर्यंत ७६ टक्के भौतिक प्रगती झाली असून, उर्वरित कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने निश्चित केले आहे. जुलै २०२७ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन असले, तरी त्यापूर्वीच बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

बांगर यांनी शुक्रवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांचा सविस्तर आढावा घेतला. प्रक्रिया टाक्या, इनलेट-आऊटलेट व्यवस्था, पंप हाऊस, गाळ प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच विविध यंत्रसामग्रीच्या उभारणीची त्यांनी पाहणी केली. प्रकल्पाच्या कामांना अधिक गती देण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देशही दिले. सध्या प्रकल्पस्थळी दररोज ६८८ कर्मचारी कार्यरत आहेत.

द्वितीय स्तरीय प्रक्रियेच्या लिक्विड लाइनचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व सुरक्षिततेला प्राधान्य देत वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मिठी नदीत जाणारे मलजल रोखणार

धारावी येथील या प्रकल्पामुळे बापट नाला आणि सफेद पूल येथून मिठी नदीत थेट मिसळणारे मलजल दुहेरी बोगद्यांद्वारे संकलित करून प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे १६८ दशलक्ष लिटर मलजल नदीत मिसळण्यापासून रोखता येणार आहे. परिणामी मिठी नदीतील जलप्रदूषण कमी होऊन पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. मर्यादित जागेचा विचार करून या प्रकल्पाची उभारणी वैशिष्ट्यपूर्ण बहुमजली रचनेत करण्यात येत आहे. या कामाला ५ जुलै २०२२ रोजी सुरुवात झाली.

दुहेरी बोगद्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश

दुहेरी बोगदा आणि रिसिव्हिंग शाफ्टच्या बांधकामासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी मिळाली आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या मलजलाची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शिफारशींनुसार स्वतंत्र प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश

Mumbai : नव्या विकासकावर जुन्या विकासकाची देणी लादणे बेकायदा; उच्च न्यायालयाचा निर्णय, महारेराचा आदेश रद्द

देशभरात ६० हजार कोटींची सुवर्ण उलाढाल; सोने खरेदीच्या उत्साहाने धनत्रयाेदशी साजरी

OBC क्रिमिलेअरसाठी पगार, कृषी उत्पन्न आधार नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का