प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

डिझेल तस्करीप्रकरणी नौका मालकाला अटक; चीन, व्हिएतनाम, दुबईतील जहाजांतून केली तस्करी

मुंबई कस्टम्स अधिकाऱ्यांनी परदेशी जहाजांकडून सुमारे ५३ हजार लिटर उच्चगती डिझेल (एचएसडी) तस्करी केल्याच्या आरोपावरून मासेमारी नौकेच्या २७ वर्षांच्या मालकाला अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई कस्टम्स अधिकाऱ्यांनी परदेशी जहाजांकडून सुमारे ५३ हजार लिटर उच्चगती डिझेल (एचएसडी) तस्करी केल्याच्या आरोपावरून मासेमारी नौकेच्या २७ वर्षांच्या मालकाला अटक केली आहे.

या डिझेलची किंमत अंदाजे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने आपल्या जबाबात चीन, व्हिएतनाम आणि दुबई येथून आलेल्या परदेशी जहाजांकडून डिझेलची तस्करी करून ते स्थानिक मासेमारी नौकांना जास्त दराने विकत असल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव एस. एच. कोळी असून तो अलिबागचा रहिवासी आहे. १३ जानेवारीला मिळालेल्या ठोस गुप्त माहितीनुसार, कस्टम्स अधिकाऱ्यांनी मुंबईपासून सुमारे ३५ ते ४० सागरी मैल अंतरावर खुल्या समुद्रात एका मासेमारी ट्रॉलरला अडवले. तपासणीदरम्यान त्या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ लपवून ठेवलेला आढळून आला. ते उच्चगती डिझेल असल्याचे निष्पन्न झाले.

तपासणीनंतर डिझेलचे एकूण प्रमाण ५३,६२९ लिटर असल्याचे ठरवण्यात आले असून त्याची अंदाजे बाजारमूल्य ३९.९० लाख रुपये आहे.

चीन, व्हिएतनाम, दुबईतील जहाजांतून केली तस्करी

तपासादरम्यान ट्रॉलरवरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यांनी कोळी यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर कोळी यांना समन्स बजावण्यात आले. २१ आणि २२ जानेवारी रोजी नोंदवलेल्या जबाबात त्यांनी चीन, व्हिएतनाम आणि दुबई येथून आलेल्या परदेशी जहाजांकडून जांकडन डिझेलची तस्करी केल्याचे मान्य केले. त्यांनी हे डिझेल प्रतिलिटर ३५ रुपयांना खरेदी करून स्थानिक मासेमारी नौकांना ६५ रुपयांना विकले, असे एका कस्टम्स अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू