Mumbai : संतापजनक प्रकार! दारूच्या नशेत तरुणाने गायीला पेटवले 
मुंबई

Mumbai : संतापजनक प्रकार! दारूच्या नशेत तरुणाने गायीला पेटवले

अंधेरी पूर्व येथे बुधवारी पहाटे एका व्यक्तीने गायीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला.

प्रतिनिधी

मेघा कुचिक

मुंबई : अंधेरी पूर्व येथे बुधवारी पहाटे एका व्यक्तीने गायीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. या घटनेत गाय भाजून जखमी झाली आहे. साकीनाका पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.

गाय जाळण्यासोबतच आरोपीने खैरानी रोडवरील यादव नगर येथील चौधरी इस्टेट कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या १५ मोटारसायकली, वीज मीटर आणि ३ ते ४ व्यावसायिक दुकानांनाही आग लावली. तक्रारदाराच्या कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दारूचे व्यसन

आकाश यादव असे या बेरोजगार आरोपीचे नाव असून तो दारुडा आहे. परिसरात अनेकदा गोंधळ घालण्याच्या प्रकारात सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरुद्ध या आधीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.

बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमाराला नशेच्या धुंदीत असलेल्या यादवने धुडगूस घातला. पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान आरोपी परिसरात हातात पेट्रोलची बाटली घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवून अवघ्या काही तासांत त्याला परिसरातून बेड्या ठोकल्या. दरम्यान, हे कृत्य त्याने पूर्व वैमनस्यातून केल्याचे समोर आले आहे. त्यातून झालेल्या वादातून त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : तयार फराळाला महागाईची फोडणी; दरांमध्ये झाली ३० ते ४० टक्क्यांनी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री

इंडिया आघाडीचा ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आज

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी चालक, ब्लॉगरला रुग्णालयातून डिस्चार्ज

FDA तील चार अधिकारी निलंबित; कारवाई करताना अनियमितता, २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय