Photo : X (@KrishPaliyath)
मुंबई

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी

रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस, ओला-उबर यांच्यानंतर मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईकरांना एक किमीला १५ रुपये मोजून इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीने मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. या टॅक्सी सेवेला महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. हे भाडे संपूर्ण राज्यासाठी लागू असून मंगळवारपासूनच ही सेवा उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस, ओला-उबर यांच्यानंतर मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईकरांना एक किमीला १५ रुपये मोजून इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीने मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. या टॅक्सी सेवेला महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. हे भाडे संपूर्ण राज्यासाठी लागू असून मंगळवारपासूनच ही सेवा उपलब्ध होणार आहे.

१८ ऑगस्ट रोजी परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये मूळ भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रवाशांना प्रति किमी १०.२७ रुपये भाडे आकारले जाणार आहे. ही भाडे संरचना खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ठरवली असून त्याच पद्धतीने रिक्षा व टॅक्सींचे भाडे निश्चित केले जाते.

बाइक टॅक्सी सेवा अधिकृत सुरू नसली तरीही काही कंपन्यांनी मुंबई महानगर प्रदेशात बेकायदेशीरपणे सेवा सुरू केल्याचे आढळून आले आहे. परिवहन विभागाने यापैकी १२३ अनधिकृत बाईक टॅक्सींवर प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत गुन्हे नोंदवले आहेत.

यंदा राज्य सरकारने एका शासन निर्णयाद्वारे १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात बाईक टॅक्सी व बाईक पूलिंग सेवांना परवानगी दिली होती. आता ‘एसटीए’च्या बैठकीत या सेवेसाठीच्या भाडे संरचनेला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या मते, या निर्णयाचा उद्देश प्रवाशांना परवडणारा व सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणे आहे.

बाईक टॅक्सी सेवेचे भाडे

१.५ किमी अंतरापर्यंत - १५ रुपये

पुढील १ किमी अंतरासाठी - १०.२७ रुपये

वाहतुकीवरील ताण कमी होईल - सरनाईक

या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

मराठवाड्यात पावसाचा कहर; जळगावमध्ये पूरस्थिती, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान