Mumbai : एल्फिन्स्टन पुलाचे ६३ टक्के काम पूर्ण; शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामाला वेग 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : एल्फिन्स्टन पुलाचे ६३ टक्के काम पूर्ण; शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामाला वेग

एल्फिन्स्टन रोड येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या दुहेरी स्तर रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलाचे आतापर्यंत ६३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाच्या खालच्या स्तरावर स्थानिक वाहतूक, तर वरच्या स्तरावर शिवडी-वरळी कनेक्टरवरील वाहतूक सुरू राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : एल्फिन्स्टन रोड येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या दुहेरी स्तर रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलाचे आतापर्यंत ६३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाच्या खालच्या स्तरावर स्थानिक वाहतूक, तर वरच्या स्तरावर शिवडी-वरळी कनेक्टरवरील वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा अडथळा कमी होण्यासह पूर्व आणि पश्चिम जोडणी अधिक सक्षम होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) शिवडी-वरळी कनेक्टरमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शिवडी आणि वरळी या दोन्ही बाजूंच्या जोडमार्गांची कामेही वेगाने सुरू आहेत. या पुलाची रचना दुहेरी स्तरावर करण्यात येत आहे.

प्रवास करणे अधिक सुलभ होणार

शिवडी-वरळी कनेक्टर हा मुंबईतील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असून, त्याद्वारे अटल सेतू आणि कोस्टल रोड यांना जोडण्याचे नियोजन आहे. या जोडणीमुळे मुंबईच्या पूर्व भागातून पश्चिम भागात तसेच मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.

वाहतूककोंडी फुटणार

सध्या प्रकल्पस्थळी पायाभूत सुविधा, पुलाचे संरचनात्मक बांधकाम आणि जोडमार्गांची कामे सुरू आहेत. मुख्य रेल्वे उड्डाणपुलाचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याने प्रकल्पाने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?