Mumbai : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल 
मुंबई

Mumbai : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) जम्बो कोविड सेंटर कंत्राटातील कथित गैरव्यवहारप्रकरणी एस्प्लानेड न्यायालयात ५०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे.

Swapnil S

पूनम अपरांज/मुंबई :

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) जम्बो कोविड सेंटर कंत्राटातील कथित गैरव्यवहारप्रकरणी एस्प्लानेड न्यायालयात ५०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. हे दोषारोपपत्र 'मेसर्स ओक्स मॅनेजमेंट कन्सलटन्सी प्रायव्हेट लिमिटेड' आणि राहुल गोम्स यांच्या विरोधात दाखल करण्यात आले असून, यात ८ साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या तपासात सिडकोचे निवृत्त अधिकारी राजेंद्र घायाडकर यांचेही नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. मात्र, त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (बीएनएसएस) च्या कलम १९७ अन्वये अनिवार्य मंजुरी मागितली आहे. घायाडकर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी तो सिडकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

कोविड काळात राहुल गोम्स यांनी दोन बनावट कंपन्यांच्या नावावर 'सिडको' कडून परवानग्या मिळवल्याचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी नवा गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक