मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

डिसेंबरची सुरुवात होताच मुंबईकरांनी ख्रिसमस आणि नववर्षाचे नियोजन जोरात सुरू केले आहे. याच उत्सवी काळात, विशेषत: ३१ डिसेंबरच्या नववर्ष स्वागत कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर, राज्य अन्न व औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अचानक तपासणी मोहीम राबवणार आहे.

Swapnil S

मुंबई : डिसेंबरची सुरुवात होताच मुंबईकरांनी ख्रिसमस आणि नववर्षाचे नियोजन जोरात सुरू केले आहे. याच उत्सवी काळात, विशेषत: ३१ डिसेंबरच्या नववर्ष स्वागत कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर, राज्य अन्न व औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अचानक तपासणी मोहीम राबवणार आहे. याचा उद्देश नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे, हा असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

एफडीएची विशेष मोहीम केवळ न्यू ईयर पार्टी ठिकाणांपुरती मर्यादित नसून ख्रिसमस आणि नववर्षासाठी बनणाऱ्या केक, मिठाई आणि स्नॅक्स तयार करणाऱ्या बेकऱ्या व खाद्य दुकानांवरही केंद्रित असेल. एफडीए अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हॉटेल्स, केक शॉप्स, फास्ट-फूड सेंटर आणि इतर खाद्य व्यवसायांनी स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, यासाठी ही कारवाई केली जात आहे. फूड बिझनेस ऑपरेटरांनी गुणवत्तापूर्ण अन्न देण्याचे आणि खाद्य सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन झिरवाळ यांनी केले. तसेच अशा तपासण्या प्रत्येक सणासुदीच्या काळात नियमितपणे केल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत १३ झोनमध्ये विशेष पथके तैनात

३१ डिसेंबरला मुंबईतील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर FDA मुंबई आपल्या १३ झोनमध्ये विशेष पथके तैनात करणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. निरीक्षक हॉटेल्स व खाद्य व्यवसायांकडे वैध एफडीए परवाना आहे का याची तपासणी तर करतीलच, पण कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल आणि एकूण स्वच्छतेचीही चाचणी घेतील. तसेच पनीर, बटर, चिकन, मटण यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता तपासली जाणार आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले.

धक्कादायक निष्कर्ष

गेल्या वर्षीच्या तपासणीत काही प्रसिद्ध हॉटेल्समध्ये अस्वच्छ स्वयंपाकघर, उंदरांचा प्रादुर्भाव, एफडीए परवाने नसणे अशा गंभीर बाबी आढळल्या होत्या. यामुळे दंड आकारणे आणि तात्पुरती बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली होती. या वर्षी दिवाळीत मिठाई, पनीर, तूप आणि सुका मेवा यांच्यात भेसळ रोखण्यावर विशेष भर देण्यात आला होता तसेच खाद्य उत्पादकांना पुन्हा वापरलेल्या तेलाचा वापर टाळण्याची सूचना देण्यात आली होती.

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

नव्या वर्षात अमृता खानविलकरची नवी इनिंग! आता रंगभूमीवर पदार्पण; म्हणाली - 'या' नाटकासाठी ‘हो’ म्हटलं, कारण...