मुंबईतील लालबाग परिसरातील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळाले. ३५व्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशामक दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. २०२१च्या ऑक्टोबरमध्येही या इमारतीमध्ये आग लागली होती. त्यावेळेस एकाच मृत्यूदेखील झाला होता. पुन्हा एकदा त्याच इमारतीमध्ये आग लागल्याने आता तेथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच संपूर्ण इमारत खाली करण्यात आली.
वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील ६० माजली इमारत आहे. या इमारतीच्या ३५व्या मजल्यावर आग लागली. सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. ही लेव्हल-1 ची आग असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ऑक्टोबर २०२१मध्ये १९ व्या मजल्यावर आग लागली होती. ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झाला होता.