मुंबई

Mumbai: ...तर वाहनमालकावर गुन्हा दाखल होणार! BMC आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा

आग लागली, झाडावर कावळा अडकला तर पहिली फोनची घंटी वाजवते ती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाची. मात्र, अनेकदा घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन दलाच्या वाहनांना बेकायदा पार्किंगचा सामना करावा लागतो आणि अग्निशमन दलावर टीकेला सामोरे जावे लागते. परंतु आता मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगचा अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : आग लागली, झाडावर कावळा अडकला तर पहिली फोनची घंटी वाजवते ती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाची. मात्र, अनेकदा घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन दलाच्या वाहनांना बेकायदा पार्किंगचा सामना करावा लागतो आणि अग्निशमन दलावर टीकेला सामोरे जावे लागते. परंतु आता मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगचा अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह, प्राणी, पक्ष्यांच्या जीविताचे तसेच वित्ताचे आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. अग्निशमन व विमोचन कार्य प्रभावीपणे राबवण्यासाठी दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने, प्रगत साधनसामुग्री व कुशल मनुष्यबळ इत्यादींद्वारे शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी घटनास्थळी धाव घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कडेला अनेक प्रकारची वाहने अनधिकृतरीत्या उभी केलेली असतात.

अशा प्रकारच्या वाहनांमुळे प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी अनेक अडथळे येतात. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य करताना अनेक अडचणी येतात. ते कार्य प्रभावीपणे राबवता न आल्याने जीवित व वित्तहानीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते.

...तर पोलीस, वाहतूकविभाग कारवाई करणार

महापालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईकरांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत पालिका प्रशासनाने कार्यप्रणाली ठरवली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत पार्किंगबाबत जर रहिवाशांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करून तक्रारदाराला माहिती देण्याचे निर्देशही अग्निशमन दलाला देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.

Mumbai : दादर-वडाळ्यात धडक कारवाई; १६३ बेकायदा बांधकामे हटवली, पालिकेच्या एफ-उत्तर विभागाची कारवाई

पोलिसांचा नकार! जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाही; द्वेषबुद्धीचा निर्णय, उपोषण होणारच - मनोज जरांगे

राज्यात हे काय चालले आहे?

आजचे राशिभविष्य, १४ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सौभाग्य, सुख-समृद्धीसाठी प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश अन् शेअर करा आकर्षक कार्ड्स