मुंबई

Mumbai Fire: ग्रँट रोडवरील धवलगिरी इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांसह ६ जंबो टँकर घटनास्थळी दाखल

आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आली आहे

विक्रांत नलावडे

मुंबईत सध्या आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक एक दोन दिवसांनी कुठेनाकुठे आग लागल्याची घटना घडत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी होतं आहे. अशातच मुंबईतील ग्रँड रोड येथील धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीच्या 11 आणि 12 व्या मजल्यावर ही आग लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या 8 गाड्या, 6 जंबो टँकर, दाखल झाले आहेत. स्थानिक पोलिस देखील सज्ज झाले आहेत.

ही आग नक्की कशामुळे लागली आहे. याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सूरू आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री