मुंबईला पुराचा धोका वाढला! १३० नवीन फ्लडिंग पॉइंट; ५६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका 
मुंबई

मुंबईला पुराचा धोका वाढला! १३० नवीन फ्लडिंग पॉइंट; ५६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका

२६ जुलैची आठवण निघाली की आजही मुंबईकरांच्या काळजात धस्स होते. ती काळरात्र पुन्हा येऊ नये, अशीच प्रार्थना मुंबईकरांकडून दर पावसाळ्यात केली जाते. मात्र आता मुंबईत आजही ४३१ ठिकाणी फ्लडिंग पाईट असून त्यात १३० नवीन फ्लडिंग पॉइंटची भर पडली असून मुंबईत सद्यस्थितीत एकूण ५६१ फ्लडिंग पॉइंट आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा धोकादायक प्रवास कायम आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : २६ जुलैची आठवण निघाली की आजही मुंबईकरांच्या काळजात धस्स होते. ती काळरात्र पुन्हा येऊ नये, अशीच प्रार्थना मुंबईकरांकडून दर पावसाळ्यात केली जाते. मात्र आता मुंबईत आजही ४३१ ठिकाणी फ्लडिंग पाईट असून त्यात १३० नवीन फ्लडिंग पॉइंटची भर पडली असून मुंबईत सद्यस्थितीत एकूण ५६१ फ्लडिंग पॉइंट आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा धोकादायक प्रवास कायम आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. पश्चिम उपनगरात सर्वाधिक १९१ फ्लडिंग पॉइंट असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दरम्यान, पावसाळ्यात नवीन फ्लडिंग पॉइंट तयार होत असतात, परंतु मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेत असते. यंदाही मुंबईत ठिकठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

पुढील दोन ते अडीच महिन्यांनंतर वरुणराजाचे आगमन होणार आहे. मार्च महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही. तर मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच पुढे आलेले नाहीत. त्यातच मुंबईत ठिकठिकाणी फ्लडिंग पॉइंट्स असल्याने मुंबई जलमय होण्याचा धोका वाढला आहे. पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा, यासाठी मुंबईत ठिकठिकाणी उच्च क्षमतेचे ५४७ पंप बसवण्यात येत आहे. मात्र रस्ता खचणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे झाडांच्या फांद्या कोसळणे, उघड्या मॅनहोलचा धोका कायम असताना ५६१ फ्लडिंग पॉइंटचा धोका यंदा कायम आहे.

जुने फ्लडिंग पॉइंट

शहर - १३९

पश्चिम उपनगर - १६१

पूर्व उपनगर - १३१

एकूण - ४३१

नवीन फ्लडिंग पाईट

शहर - ३५

पश्चिम उपनगर - ३०

पूर्व उपनगर - ६५

एकूण - १३०

१ हजार क्यूबीक मीटर ताशी पाणी उपसा

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण ५४७ पंप बसवण्यात येणार आहेत. ताशी ६० क्यूबीक मीटर ते १ हजार क्यूबीक मीटर क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग