मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा; CBI कडून क्लीनचिट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना खंडणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात सीबीआयने क्लीनचिट दिली असून तसा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केला आहे.

Swapnil S

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना खंडणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात सीबीआयने क्लीनचिट दिली असून तसा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तर, जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांत तपासाअंती सीबीआयने परमबीर सिंह यांना क्लीनचिट दिली आहे.

परमबीर सिंग यांनी ठाणे आणि त्यानंतर मुंबई पोलीस दलात आयुक्त पदावर काम केले. मात्र, निवृत्तीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. २०१८ मध्ये परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी यूएलसी घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या विरोधातील मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप अगरवाल यांचे पुतणे शरद यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनील आणि संजय यांना एका खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनीही अटक केली होती. त्याचबरोबर ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणांना पाठविले होते. त्यापाठोपाठ त्यांनी परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अनेक पोलीस अधिकारी अडचणीत

या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कल्याण बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणामुळे परमबीर सिंह यांच्याह अनेक पोलीस अधिकारी अडचणीत आले होते. या दोन्ही प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणांचा तपास केला असता, त्यामध्ये काही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही गुन्ह्यांत परमबीर सिंग यांनी क्लीनचीट दिली असून तसा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल