Mumbai : फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना नवसंजीवनी; संवर्धन, दुरुस्तीसाठी तीन वर्षांचा करार, BMC करणार २.५१ कोटी रुपये खर्च 
मुंबई

Mumbai : फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना नवसंजीवनी; संवर्धन, दुरुस्तीसाठी तीन वर्षांचा करार, BMC करणार २.५१ कोटी रुपये खर्च

मुंबईतील फोर्ट परिसरातील फ्लोरा फाऊंटन, रुस्तमजी मुलजी कारंजे, संगमरवरी पुतळे इत्यादी ऐतिहासिक वास्तूंची देखभाल दुरुस्तीचे तीन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरातील फ्लोरा फाऊंटन, रुस्तमजी मुलजी कारंजे, संगमरवरी पुतळे इत्यादी ऐतिहासिक वास्तूंची देखभाल दुरुस्तीचे तीन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका २ कोटी ५१ लाख ४९ हजार ६३६ रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

मुंबई शहर व उपनगरात अनेक पुरातन वास्तू असून मुंबईमधील फोर्ट विभागात पुरातन वास्तूंचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत येणारे पर्यटक हे मुख्यतः या वास्तूंच्या कलाकुसर व बांधकामांनी आकर्षित होतात; परंतु त्या वास्तूंची योग्य देखभाल न घेतल्यास पर्यटक नाराज होतात. आता अशा आकर्षित करणाऱ्या पुरातन वास्तूंची सातत्याने देखभाल करून त्या वास्तूंचे मूळ सौंदर्य राखल्यास पर्यटक जास्त आकर्षित होतील.

या वास्तूंची विशेष काळजी घेणार

  • फ्लोरा फाऊंटन - साफसफाई, स्टीम क्लिनिंग, लॉन देखभाल, दिवस-रात्र सुरक्षा

  • फिट्झगेराल्ड फाऊंटन - पीयू कोटिंग, पंप-दिव्यांची देखभाल, दगडी दुरुस्ती

  • वेलिंग्टन फाऊंटन - कारंजे संवर्धन, विद्युत परिरक्षण, सुरक्षा व्यवस्था

  • रुस्तमजी मुलजी कारंजे - स्टीम क्लिनिंग, लोखंडी कुंपण दुरुस्ती, सनशेड कॅनोपी

  • कोठारी प्याऊ - पाण्याच्या टाक्या, फिल्टर, ड्रेनेज व फिटिंग्जची देखभाल

  • बॅण्डस्टँड स्मारक - फरशी-पायऱ्यांची स्वच्छता, अग्निरोधक रंग देखभाल

  • कांस्य धातूचे पुतळे - रासायनिक स्वच्छता, ऑक्सिडायझिंग, पीयू कोटिंग

  • संगमरवरी पुतळे - मार्बल पॉलिशिंग, बफिंग

पुरातन वास्तूंबाबत उपाययोजना

मुंबईच्या दमट हवामान व सततच्या ऊन-पावसामुळे, प्याऊ / कारंजे/पुतळ्यांवर रासायनिक प्रक्रिया होऊन दगडांना बुरशी येणे, दगडाच्या खाचांमध्ये वनस्पतीची वाढ होणे, कारंज्यामधील पाणी दूषित होणे, ओतीव लोखंडावरील आवरण खराब होणे, दिवा-बत्तीमध्ये बिघाड होणे, वास्तूंचा गैरवापर रोखण्यासाठी सातत्याने परिचलन व परिरक्षण करण्यात येते.

कारंजे, प्याऊ, पुतळ्यांच्या संवर्धनासाठी करार

मुंबईच्या वारसा ठरलेल्या फ्लोरा फाऊंटनसह फोर्ट परिसरातील कारंजे, प्याऊ आणि पुतळ्यांच्या संवर्धनासाठी तीन वर्षांचा करार करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई, स्टीम क्लिनिंग, दुरुस्ती आणि प्याऊ कोटिंग ही कामे केली जाणार आहेत. कारंजे, पंप, दिवे, विद्युत यंत्रणा, लॉन आणि झाडांची नियमित देखभाल तर सुरक्षा व्यवस्था आणि सनशेड कॅनोपी उभारण्यात येणार तसेच कांस्य व संगमरवरी पुतळ्यांची विशेष रासायनिक स्वच्छता आणि पॉलिशिंग केले जाणार आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग